कुख्यात शुभम जाटच्या टोळीवर मोक्का

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कठोर कारवाई करीत कुख्यात गुन्हेगार शुभम जाट याच्या आठ आरोपींच्या टोळीवर मोक्का लावला. महिनाभरापूर्वी टोळीयुद्ध भडकल्यानंतर या टोळीने मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन भागात गोळीबार केला होता. त्या प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
शुभम भिकूलाल जाट (३१, रा. म्हस्के पेट्रोल पंपाच्या मागे, बीड बायपास), मयूर संजय उणगे (२१, रा. साईराजनगर, जयभवानीनगर, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसर), शिवा रमेश भालेराव (२०, गल्ली नं ३, विश्रांतीनगर), विजय दिनकर धनई (२४), मनोज संजय पडूळ (२५), सागर प्रशांत राऊत (२०, तिघे रा. गल्ली नं १४, जयभवानीनगर), अमर ऊर्फ अतुल गणेश पवार (४०, रा. हमालपुरा, सदरबाजार, जालना) आणि ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली मनोहर यादव (३२, रा. जयभवानीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, उपनिरीक्षक अर्जुन राऊत, रेशीम कोळेकर, विनोद भालेराव, अंमलदार दिपाली सोनवणे, महादेव दाणे, संदीप बीडकर आदींनी केली. मोबाइल अन् मुलीच्या वादातून महिनाभरापूर्वी १९ जानेवारीला दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये गँगवॉर पेटले होते. या प्रकरणात पुंडलिकनगरचे उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांनी पाठलाग करून शुभम जाटसह टोळीतील आरोपींना अटक केली होती.